SIP Investment Scheme : सध्याच्या या महागाईच्या काळात पैशाची बचत आणि गुंतवणूक करणे अतिशय महत्वाचे आहे. हि गुंतवणूक करत असताना आपला पैसा सुरक्षित कसा राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त व्याज कसे मिळेल यावर आपला भर असतो. सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय राहिला आहे. म्युच्युअल फंड म्हणून मिळणार रिटर्न हा शेअर बाजारावर जरी अवलंबून असला तरी बँक आणि इतर काही पर्यायांपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक फायदशीर ठरते. म्युच्युअल फंड मधील SIP Investment Scheme हि अशी एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही नियमितपणे काही ठराविक रकमेची गुंतवणूक दीर्घ काळासाठी केली तर तुम्ही काही वर्षातच भलामोठा फंड जमा करू शकता.
कसे व्हाल करोडपती- SIP Investment Scheme
उदाहरण द्यायचं झाल्यास, समजा तुम्ही दर महिन्याला तुमच्या पगारातून ३००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही ३० वर्षात करोडपती होऊ शकता. कसे ते जाणून घेऊया … SIP गुंतवणुकीवरील सरासरी परतावा साधारणपणे 12% असतो किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी SIP मध्ये दर महिन्याला 3,000 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली आणि 25 ते 30 वर्षे नियमितपणे अशीच गुंतवणूक सुरु ठेवली तर 25 वर्षांनंतर एकूण गुंतवणुकीची रक्कम 35,40,494 रुपये होईल. जर 12% ने रिटर्न पकडला तर 92,86,144 रुपये व्याजासहित तुमची मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,28,26,638 रुपये मिळतील.
जर तुम्ही हाच कालावधी 25 वरून ३० वर्षांपर्यंत वाढवला तर तुमची एकूण गुंतवणूक 59,21,785 ररुपये होईल आणि . 2,05,80,586 व्याजासह मॅच्युरिटी वर तुम्हाला 2,65,02,371 रुपयांचा दमदार रिटर्न मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कि तुम्हाला नियमितपणे दर महिन्याला ठराविक रक्कम त्या त्या तारखेला भरावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीमध्ये शार बाजारातील जोखीम असते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एसआयपी मधील कोणत्या योजनेत (SIP Investment Scheme) पैसे गुंतवावे हे ठरवा आणि मगच गुंतवणूक करा.