दहावीच्या मुलींसोबत अश्लील चाळे करणारे ‘सर’ गजाआड

औरंगाबाद – दहावीतील विद्यार्थी मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खाजगी क्लासेसचा चालक आणि शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या वडिलांचा तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात पोकसो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची माहिती निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली आहे. अमोल रावसाहेब गवळी (33, रा. पडेगाव) असे या आंबटशौकीन शिक्षकाचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, दहावीच्या एका 15 वर्षीय मुलीच्या पित्याने दामिनी पथकास फोन करून क्लासचालक मुलीची छेड काढत असल्याचे सांगितले. उपनिरीक्षक सुवर्णा उमाप हवालदार, आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि चालक गिरीजा आंधळे यांनी तात्काळ पडेगाव गाठले. आधी त्यांनी मुलीच्या कुटुंबांची भेट घेतली तेव्हा, अमोल गवळी मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, भौतिकशास्त्र शिकवताना त्यातील अश्लीलता सांगणे, तुम्ही माझ्या सोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही, असे सतत बोलत असल्याची आपबिती मुलींनी सांगितली. त्यानंतर उपनिरीक्षक उमाप व आंधळे या साध्या वेशात क्लासमध्ये गेल्या.

‘सर, तुम्ही फिजिक्स विषय खूप चांगला शिकवता आमच्या मुलींना ही शिकवणी लावायची आहे’ असे त्यास सांगितले. त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवले‌. त्यानंतर छावणी पोलिसांचे गाडी बोलावून घेत गवळीला ताब्यात घेतले तिथे मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यानंतर सहाय्यक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी मुलीचा जबाब नोंदवला.

You might also like