धक्कादायक !! पोलीस ठाण्यातच केली मेव्हण्याने जावयाची हत्या

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी । आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संशयावरून भावाने आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कोळेकर असे मयत जावयाचे नाव असून रवींद्र उर्फ योगेश असे आरोपी मेव्हण्याचे नाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा संपूर्ण धक्कादायक प्रकार पोलीस ठाण्यातच घडला.

दरम्यान, मयत आकाशची पत्नी कोमल हिने रविवारी सकाळी राहत्या घरी साडीचा वापर करून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आकाशाला चौकशीसाठी आणल होत. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये फारसा स्टाफ ड्युटीवर नव्हता. बहुतेक सर्वजण निवडणूकीच्या कामासाठी बाहेर होते. ठाण्यातील राठोड नावाचे कर्मचारी आकाश कोळेकर याचा जबाब एका गुन्ह्या संदर्भात घेत होते. इतक्यात आकाशचा मेव्हणा रवींद्र उर्फ योगेश अचानक तिथं आला. त्याने बेसावध असलेल्या आकाशच्या मानेवर व गळ्यावर धारधार चाकूने वार केले. आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या रागातून आकाशला धडा शिकविण्यासाठी तयारी करूनच योगेश पोलीस ठाण्यात पोहचला होता.

रक्तबंबाळ झालेल्या आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. योगेशची बहीण कोमल कोळेकर ही ८ महिन्यांची गरोदर होती. त्यामुळ तिच्या आत्महत्येंन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी मेहुणा रवींद्र उर्फ योगेशला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here