धक्कादायक ! मुलगी झाल्यानं नणंदेनं वहिनीला जिवंत जाळलं

Women Fire
Women Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील दातपडी याठिकाणी एका विवाहित महिलेला जिवंत जाळण्यात आले आहे. विशेष म्हणजे नणंदेनंच अंगावर रॉकेल टाकून वहिनीला जिवंत जाळलं आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित महिला 80 टक्के भाजलेली होती. अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पांढरकवडा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मृत महिलेचं नाव मोनिका गणेश पवार असे आहे. 4 जुलै रोजी मोनिका यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. तसेच त्यांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. पण मोनिका यांनी दुसऱ्या वेळी मुलीला जन्म दिल्यानं, आता माहेरी आपल्या लेकीचा लाड कोण करणार या भावनेतून नणंदेनं आपल्या वहिनीसोबत करायला सुरुवात केली. यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपी नणंदने आपल्या वहिनीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं आहे.

या घटनेनंतर घरातील इतर नातेवाईकांनी मोनिकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्या 80 टक्के भाजल्यानं त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपी नणंद कांता संजय राठोड हिच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पांढरकवडा पोलिसांनी 302 कलामांर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची कसून चौकशी केली असता भावालाही मुलगी झाली, त्यामुळे आता माहेरी आपल्या लेकीचे लाड कोण करणार? या भावनेतून नणंदेनंच वहिनीला जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पांढरकवडा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.