मुंबई प्रतिनिधी । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही असा घणाघाती आरोप सरकारवर केला आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रभाकर यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याच वाक्याचा आधार घेत राष्ट्रवादीने सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. खुद्द अर्थमंत्र्याचे पतीच असे सांगतात तर सरकार यावर गंभीरपणे विचार करणार का? यासोबतच अर्थमंत्री हा सल्ला ऐकणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
अकलूजमध्ये माळशिरसमधील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा नीचांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे” असं पराकला प्रभाकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटलं होतं.
“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं. पराकला प्रभाकर हे हैदराबादमधील “राईट फोलियो” नावाच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
अकलूजमधील सभेनंतर शरद पवार यांचं ट्विट –
#अकलूज मध्ये #माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत राज्यातील भीषण आर्थिक संकटाबाबत चिंता व्यक्त केली. #NCP2019 pic.twitter.com/Nc5sOmjbFA
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 15, 2019