गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
हा प्रकार दिल्लीच्या सायबर सिटी गुरुग्राममध्ये घडला आहे. किर्ती रुग्णालयात 20 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यामधील 6 जणांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेचा आता व्हिडिओ समोर आला आहे. जेव्हा रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा आयसीयूला कुलूप होते आणि रुग्णालयातील कर्मचारीसुद्धा गायब होते.
https://twitter.com/RahulGandhi/status/1389949761768370177
या व्हिडिओबाबत रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण देताना समोर आलेला व्हिडिओ जुना असून, सध्याच्या परिस्थितीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही एक हत्या असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा तसेच रुग्ण दगावत असताना डॉक्टरांनी रुग्णालयातून पळ काढला हि एक धक्कादायक गोष्ट आहे.