हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर्वात व्यस्त राजीव चौक मेट्रो स्टेशनवर काही लोकांनी ”देश के गद्दारों को, गोली मारो..”अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा सध्या व्हिडिओ व्हायरल झाला असून. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेले काही लोक ‘देश के गद्दारों को, गोली मारो..’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. या प्रकरणात ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली मेट्रो कॉरपोरेशन लिमिटेड (DMRC) ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही घटना सकाळी 10.52 वाजता घडली. स्टेशनवर तैनात मेट्रो कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचार्यांनी घोषणा देणाऱ्यांना दिल्ली मेट्रो रेल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तसेच दिल्ली मेट्रो कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रदर्शनावर बंदी असल्याचेही दिल्ली मेट्रोतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राजीव चौक मेट्रो स्टेशनवर ट्रेन थांबत असताना ६ जणांनी घोषणाबाजी सुरू केली. सदर घोषणाबाजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ होत असल्याचं पाहून काही त्याला समर्थन देत तरुणांनी घोषणाबाजी केली तर काही प्रवाशांनी घोषणा देणाऱ्यांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती.
On 29/02/2020 at about 10: 25 hrs six youths were seen shouting slogans at Rajiv Chowk metro station, Delhi. They were immediately intercepted by CISF personnel & thereafter handed over to Delhi Metro Rail Police officials for further action. Metro Rail operation remained normal. pic.twitter.com/YyHQi4PAZo
— CISF (@CISFHQrs) February 29, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.