केवळ 10 रुपयांमध्ये करा आता 150 किलोमीटरचा प्रवास, आझमगडच्या तरुणाचा अप्रतिम शोध

six seater electric bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिक मोठ्या चिंतेत आहेत. अनेक जण याचा पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील एका तरुणाने तयार केलेल्या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या तरुणाने तयार केलेल्या इलेक्ट्रिक गाडीवरून (electric bike) एकाचवेळी 6 जण प्रवास करू शकणार आहेत. याचबरोबर यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जास्त खर्चाची गरज नसून केवळ 10 रुपयांमध्ये हि इलेक्ट्रिक गाडी 150 किलोमीटर चालणार आहे. आझमगडच्या फखरुद्दीन पुर मधील असहद अब्दुल्ला नावाच्या तरुणाने हि गाडी तयार केली असून याचा वेग ताशी 40 किलोमीटर असणार आहे. असहद अब्दुल्ला याने आयटीआय मधून आपले मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून सोबतच त्याने बीसीए देखील केले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने 12 हजार रुपये खर्च करून भंगारामधील वस्तूंमधून हि 6 सीटर गाडी (electric bike) तयार केली आहे.

या 6 सीटर गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर असहद अब्दुल्लाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. याविषयी बोलताना त्याने सांगितले कि अशा प्रकारच्या गोष्टींचा शोध लावण्याची त्याला लहानपणापासून सवय आहे. याआधी त्याने त्याच्या केटीएम गाडीचे इलेक्ट्रिक गाडीमध्ये (electric bike) रूपांतर केले आहे. याचबरोबर त्याने अनेक छोट्या मोठ्या खेळण्यांमधून अशा प्रकारच्या गोष्टी तयार केल्या आहेत. असहद अब्दुल्लाच्या या अविष्काराबद्दल बोलताना या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात आनंदी असल्याचे दिसत आहे. एखाद्या मुलाने अशा प्रकारचा काही अविष्कार केला कि खूप आनंद होतो असे येथील नागरिकांनी बोलताना सांगितले. याचबरोबर वाढत्या पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमतींमधून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सरकारने देखील अशा प्रकारच्या गोष्टी सामान्य नागरिकांना परवडण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

गाडीचे पेंटट नोंदविण्याचे प्रयत्न सुरु
याविषयी माहिती देताना असहद अब्दुल्लाने सांगितले कि या गाडीचे (electric bike) रजिस्ट्रेशन आणि पेंटट नोंदविण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फायदा होणार असून हा अविष्कार लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. या गाडीसारखे आणखी काही प्रयोग तो करणार असून भविष्यात सोलर प्लेन आणि अनेक गॅजेट्स तयार करणार आहे.

हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका