पुण्यात येणार हवेत उडणारी बस; वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः हैराण झाले आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येत असतात, त्यामुळे पुण्याची लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी असा दुहेरी प्रश्न निर्माण झालाय. पुण्यात नुकतीच मेट्रो सुरु करण्यात आली असून थोड्याफार प्रमाणात वाहतुक कोंडीला आळा बसला आहे, मात्र प्रश्न तसाच अजूनही कायम आहे. परंतु पुणेकरांचा हा प्रश्न लवकरच सुटणार आहे, कारण आता पुण्यात हवेत उडणारी बस पाहायला मिळणार आहे.

देशाचे परिवहनमंत्री नीतिन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी परदेश दौऱ्यावरअसताना स्कायबस तंत्रज्ञानाची पाहणी केली होती व लवकरच हे तंत्रज्ञान भारतात  आणून याद्वारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रबळ बनवून देशातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीच्या समस्याला दूर करण्याचा प्रयत्न होणार असे दिसत  असतानाच आता हवाई बस देशात सुरवातीला पुणे शहरांत सुरु होणार असल्याचे कळत आहे. पुण्याबरोबरच देशातील एकूण पाच मुख्य शहरांमध्ये हवाई  बस चालवली जाईल. यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा मेट्रो बरोबरच आणखी एक नवीन पर्याय लवकरच मिळणार आहे. येत्या दोन वर्षांत ही सेवा सुरु होणार आहे. यासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्व गोष्टी परिवहन  मंत्रालयाकडे घेतल्या जाणार आहेत.

मडगावात होणार ट्रॉयल रन

हवेत उडणाऱ्या बस साठी आवश्यक असलेले ट्रायल रन  हे गोवा राज्यातील मडगांव येथे होणार आहेत अशी माहिती मिळत आहे. बी.राजाराम यांच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये गोवा ते मडगाव हा 1.6 किमीचा मार्ग तयार करण्यात आला होता.यावर हवाई बसचे ट्रायल 2004 मध्ये झाले होते. परंतु चाचणी दरम्यान झालेल्या अपघातामुळे ही बससेवा सुरु झाली नाही. 2016 मध्ये ट्रॅक आणि पिलर काढण्यात आले. त्यावेळी हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाकडे होता. आता नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.  मेट्रोच्या तुलनेत हा मार्ग 50% टक्के स्वस्त असणार आहे. दुरुस्तीचा खर्चही कमी असणार आहे. हवाई बससाठी फक्त स्थानकासाठी जमीन लागणार आहे. स्कायबसचा रुट डिव्हाइडर वरती करण्यात येणार आहे. डिव्हाइडरवर पिलर बसवून हा रुट तयार केला जाणार आहे. स्काय बस 100 किमी वेगाने धावू शकते. या हवाई बसमधून एकावेळी 300 जण प्रवास करु शकणार आहेत. स्थानकात ट्रावर्सर या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.