हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल, टीव्ही हे आपल्या सर्वांच्या मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर रात्री वेळ मिळाल्यानंतर अनेकांना सवय असते ती टीव्ही आणि मोबाईल पाहण्याची. ते पाहिल नाही तर अनेकांना झोप येत नाही. म्हणून ते टीव्ही आणि मोबाईल पाहता पाहताच झोपी जातात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का तुमची ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते. नसेल माहिती तर घाबरू नका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सवयी मागचे दुष्परिणाम. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत दुष्परिणाम.
काय आहेत दुष्परिणाम?
1) वजन वाढण्याची असते शक्यता :
मनोरंजनाचे केंद्र तर मोबाईल आणि टीव्ही झालेलेच आहेत. मात्र त्यामध्ये वाढलेली सिरीज, ड्रामाची क्रेज यामुळे रात्री झोपताना या सिरीयलचे बघण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे बघता बघता कधी झोप लागून जाते समजतच नाही. परंतु तुमच्या अश्या सवियीमुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. झोपेची सायकल बिघडली जाते आणि परिणामी वजन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती आजच बंद करा. अन्यथा इतर आजारांना आमंत्रण दिले जाईल.
2) मधुमेह होतो :
शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे मोबाईल किंवा टीव्हीची स्क्रीन पाहता पाहता झोपल्यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या पातळी मध्ये बिघफ होऊन त्यांच्यामध्ये साखरेचे प्रमाण वाढले जाते आणि त्यामुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात.
3) मेंदूवरती होतो परिणाम :
टीव्ही असो वा मोबाईलची स्क्रीन यामुळे डोळ्यावर तर परिणाम होतोच. मात्र सर्वाधिक परिणाम हा आपल्या मेंदूवरती होतो. रात्रभर टीव्ही आणि मोबाईलची स्क्रीन पहिल्यानंतर आपल्या मेंदूचे मानसिक संतुलन बिघडते. आणि परिणामी अशी लोक झोप पूर्ण न झाल्यामुळे चीडचीड करायला लागतात. तसेच डोकं दुखणे, डोळ्यांची आग होणं यासारख्या समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी तुम्हाला आजच ही सवय मोडावी लागेल. त्यासाठी आठ तास झोप शरीराला होणे आवश्यक आहे.
4) चेहऱ्यावरती पिंपल्स येणे :
ज्याप्रमाणे मोबाईलची स्क्रेनशॉट अधिक पहिल्यानंतर डोळ्यावर ताण येतो त्याचप्रमाणे तुमची जर झोप पूर्ण नाही झाली तर तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. त्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढून तुमचा चेहरा विद्रुप होऊ शकतो. म्हणून याची काळजी घेणे आवश्यक असते.
5)फोन सायलेंट किलर बनून करतो तुमच्या आरोग्यावर परिणाम
अनेकांना आपला फोन हा आपल्या उशासी लागतो. परंतु तो तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असतो. मोबाईल तयार करताना वापरण्यात आलेले उपकरण हे अत्यंत धोकायदायक रेडियेशन बाहेर टाकतात ज्यामुळे तुमच्या डोक्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच तुमचे स्नायू दुखणे चालू होतात. जर तुम्ही हाच फोन तुमच्यापासून थोड्या दूर अंतरावर ठेवला तर मोबाईल मध्ये जोडल्या गेलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची ताकद कमी होते आणि मेंदू बाबत जाणवणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे आजच या सवयीपासून दूर जा. अन्यथा तुम्ही आजरांना आमंत्रण देत आहात.