लहान बाळाला जेवताना मोबाइल देत असाल तर होईल ‘हे’ नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल मोबाइल म्हणजे एक प्रकारचे खेळणे झाले आहे. मोबाइल हा सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून वापरला जातो. मोबाइल मुळे अनेक वेळा आपली कामे हलके होतात. आत्ताच्या घडीला मोबाइल वापरणे फार गरजेचे झाले आहे. मोबाइल च्या वापराने लहान मुलांना सुद्धा त्रास होऊ शकतो पण कोरोना नंतर च्या काळात अगदी मुलांचे शिक्षण हे मोबाइलच्या माध्यमातून होत आहे. मोबाइल हे महतवाचे साधन बनले आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळे जण मोबाइल वापरतात. त्यामुळे मोबाइल हे दैन्यंदिन आयुष्यातला एक महत्वाचा भाग बनला आहे.

पहिल्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे मुलांना घेण्यासाठी एकत्र कुटुंबात अनेक लोक होती पण आजकाल सगळी कुटुंबपद्धती हि विभक्त प्रकारची कुटुंबपद्धती असल्याने कोणतेही जबाबदारीचे काम हे फक्त लहान मुलांच्या आईवडीलांवर येते. त्यामुळे आईची सगळ्यात जास्त चिडचिड होते. तर कधी कधी मुलं जेवत नसल्यास आया स्वतः मुलांना मोबाइल देतात. आणि मग मुलांना खाऊ भरवतात. पण हि जी पद्धत आहे मुलांना खाऊ भरवण्याची आहे ती अत्यंत चुकीचं पद्धत आहे. मुलांना खाऊ देताना या पद्धतीचा वापर करू नये. कारण मुलांचे डोळे हे अत्यंत नाजूक स्वरूपाचे डोळे असतात. आणि त्या नाजूक डोळ्यांवर स्कीन चा मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट करताना किंवा त्यांना सवय लावताना आई वडिलांनी दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे.

लहान मुलांच्या बाबतीत एक गोष्ट होत असते की, अनेक वेळा आई वडील आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. आपल्या मुलांना वेळ न दिल्याने मुलांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करमणुकीचे साधन हे हवे असते. त्यासाठो मग मुले हि आई वडिलांच्या मोबाइलचा आधार शोधतात. अनेकी वेळा आपण आपल्या आजूबाजूला फक्त आई वडील आणि एकुलता एक बाळ हे असेच कुटुंब पाहायला मिळते. त्यामुळे मुलांना फक्त आई वडिलांचिंच सवय असते. त्यामुळे मुलांना कुठेही घेऊन गेले तर त्यांना खेळण्यात आनंद नसतो तर त्यांना आपल्याला मोबाइल हि वस्तू कधी मिळते याची प्रतीक्षा करत असतात. लहान वयातच मुलांना चष्मा लागला असल्याचे आपण अनेक वेळा पाहतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment