नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत ; राहुल गांधीं आरएसएसवर बरसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तमिळनाडूमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरचे ‘निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला.

तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील आणि त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले, तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल’, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.

मी आपल्याशी माझी ‘मन की बात’ सांगायला आलो नाही. मी आलोय ते तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेण्यासाठी… मी इथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलोय. ना की माझ्या मनातली ‘मन की बात सांगण्यासाठी…’, असं म्हणत त्यांनी मोदींच्या ‘मन की बात’वर देखील सडकून टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment