हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यादरम्यानच, आता फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली गेली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहिती नुसार, नवीन दर 11 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत.
FD वरील नवीन व्याजदर
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3%,46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 3.5% व्याज दर मिळत राहील. त्याच वेळी, आता 91 ते 180 दिवसांच्या FD वर 4.5% 181 ते 364 दिवसांच्या FD वर 5.5%, 12 ते 24 महिन्यांच्या FD वर 6.75 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 500 दिवसांच्या कालावधीसाठी 7.25 टक्के आणि 1000 दिवसांच्या कालावधीसाठी 7.75 टक्के व्याजदर दिला जाईल. Bank FD
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अतिरिक्त व्याज (Bank FD)
ज्येष्ठ नागरिकांना फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून सर्व कालावधीच्या FD वर स्टॅण्डर्ड व्याजदरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याज दिले जाईल. आता ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50% आणि 8.25% दराने व्याज मिळेल.
बँकेच्या वेबसाइट वरील माहिती नुसार, “60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असे म्हंटले जाते. जॉईंट खातेदारांच्या बाबतीत, जिथे खातेदारांपैकी एक ज्येष्ठ नागरिक असेल, अशा प्रकरणी जर ज्येष्ठ नागरिक या FD चा ‘प्रथम धारक’ असेल तरच त्याला ज्येष्ठ नागरिक FD वरील व्याज दर मिळेल.Bank FD
अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Bank FD
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.fincarebank.com/interest-rate
हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!