हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Savings Scheme : केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता या योजनांवरील व्याजदर केंद्र सरकारने वाढवले आहेत. यामध्ये किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स स्कीम आणि सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम सारख्या योजनांचा समावेश आहे. हे जाणून घ्या कि, आता या बचत योजनांच्या व्याजदरात 10 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढ केली गेली आहे. मात्र, PPF वरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आला आहे. तसेच किसान विकास पत्रावरील व्याज 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के, मंथली इनकम अकाउंटवरील व्याज आता 7.1 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आता 8 टक्क्यांऐवजी 8.2 टक्के व्याज मिळणार आहे. Small Savings Scheme
The rates of interest on various Small Savings Schemes for the first quarter (Q1) of financial year 2023-24 starting from 1st April, 2023 and ending on 30th June, 2023 have been revised as follows👇 pic.twitter.com/OwLr8MxhGU
— Ministry of Finance (@FinMinIndia) March 31, 2023
टाइम डिपॉझिट्सवरील व्याजदरातही केली वाढ
केंद्र सरकार कडून एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. आता एका वर्षाच्या टाइम डिपॉझिट्सवर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे. आतापर्यंत 6.6 टक्के व्याज मिळत होते. दोन वर्षांच्या टाइम डिपॉझिट्सवर 6.9 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी हा दर 6.8 टक्के होता. त्याचप्रमाणे तीन वर्षांच्या टाइम डिपॉझिट्सवरील व्याज 6.9 टक्क्यांवरून 7.0 टक्के करण्यात आले आहे. Small Savings Scheme
त्याच प्रमाणे आता गुंतवणूकदारांना 5 वर्षांच्या टाइम डिपॉझिट्सवर 7 टक्क्यांऐवजी 7.5 टक्के व्याज मिळेल. तर, 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट्सवरील व्याज दर 5.80 टक्क्यांवरून 6.20 टक्के करण्यात आला आहे. Small Savings Scheme
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=62
हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल