LPG सिलेंडरवर येणार स्मार्टलॉक आणि बारकोड, OTP टाकूनच उघडू शकता सिलेंडर; गॅसचोरीला चाप बसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरपोच आलेल्या गॅस सिलेंडरमध्ये निर्धारित केलेल्या वजनापेक्षा कमी गॅस असल्याची तक्रार नेहमीच ऐकायला मिळत असते. मोठ्या सिलिंडरमधून गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये भरल्याचा नेहमी आरोप लागतो. बऱ्याच अंशी हे खरे देखील असते. सिलेंडरचे पूर्ण पैसे दिल्यानंतरही पूर्ण गॅस मिळत नाही. यापासून सुटका करून घेण्यासाठी गॅस कंपन्यांनी नवीन वाटप पद्धत आणली आहे. यापुढे सिलेंडरमध्ये स्मार्ट लॉक असणार आहे. ज्याला उपभोक्तासोडून कोणीही उघडू शकणार नाही. यामुळे गॅस चोरी थांबली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही नवीन प्रक्रिया सुरू केली गेली होती. परंतु आता जवळपास सर्व सिलेंडरला ही प्रक्रिया अवलंबिली जाईल. गेल्यावर्षी गॅस कंपन्यांनी डिलिव्हरी स्कॅन कोड सुरू केले होते. ज्यामध्ये OTP पाठवला जातो. व त्याच्या आधारे गॅस सिलेंडर अनलॉक केले जाते. मोबाईलवर OTP पाठवून मगच याची निश्चिती केली जाते. यामुळे केवळ ग्राहकच सिलेंडर उघडू शकणार आहे.

या नवी टेक्नॉलॉजीमुळे गॅस भरणाऱ्या प्लांटमध्ये सिलेंडरवर बारकोड आणि स्मार्ट लॉक लावले जाईल. सिलेंडर विक्रेते ज्यावेळी घरी सिलेंडर घेऊन येतील त्यावेळेस या सिलेंडरवर लावलेल्या बारकोडला स्कॅन करावे लागणार आहे. बारकोड स्कॅन केल्यानंतर ग्राहकांना मोबाईलवर एक ओटीपी येईल. सिलेंडरचे लॉक खोलण्यासाठी हा OTP गरजेचा असेल. हे स्मार्टलॉक उघडल्यानंतर गॅस वितरकाला ते परत द्यावे लागणार आहे. यामुळे गॅस चोरी होण्याची शक्यता कमी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment