‘या’ ॲपसह खरेदी केल्यास मिळणार 50% पर्यंत सूट; SBI ची नवीन ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने युनो ॲपच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या लोकांना कॅशबॅकची सुविधा देण्याची मोठी घोषणा केली आहे. 4 ते 7 मार्च दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाची ही ऑफर चालू राहणार आहे. परंतु हा कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना नियम आणि अटीचे पालन करायचे आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून या स्पेशल ऑफरची माहिती दिली आहे. 4 ते 7 मार्च दरम्यान या माध्यमातून पेमेंट केल्यावर खरेदीसाठी मोठा डिस्काउंट मिळू शकणार आहे. ॲमेझॉन, अपोलो, वेदांत आणि ओयो यासारख्या मोठ्या ब्रँडच्या प्रॉडक्टवर मोठा डिस्काउंट मिळू शकणार आहे. या माध्यमातून खरेदी केल्यास पैशांची मोठी बचत होऊ शकणार आहे. योनो ॲपने ॲमेझॉनवर शॉपिंग केल्यास 7.5 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळतो. तसेच वेगवेगळ्या हॉलिडे पॅकेजवर http://EaseMyTrip.com वेबसाईटच्या माध्यमातून 850 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकणार आहे.

फॅशन आणि ट्रॅव्हल सोबत औषधांच्या खरेदीवरही ॲपच्या माध्यमातून सूट मिळणार आहे. औषधांच्या खरेदीवर 20 टक्के सूट याच्या माध्यमातून मिळू शकते. औषधांच्या सोबत आरोग्यासंबंधीत प्रॉडक्टच्या माध्यमातून खरेदी केल्यास सवलत मिळते. रेमंड कपड्यांवर 20 टक्के डिस्काउंट असून, वेदांत वरून खरेदी केल्यास 50 टक्के आणि 25 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच ओयो हॉटेलचे बुकिंग केल्यानंतर 50 टक्केपर्यंत मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment