औरंगाबाद | ट्रॅक्टरमध्ये कडब्याच्या गंजीखाली लपवून देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांस गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहात अटक केली. यावेळी ट्रॅक्टरसह पोलिसांनी 18 देशी दारूचे बॉक्स जप्त केले. सदरची कारवाई झाल्टा फाटा ते चिकलठाणा रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी पुंडलिकनगर आणि सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी नवनाथ श्रीमंत बोडखे (३२) याला कारमधून दारु वाहतूक करताना अटक केली. तर गुन्हे शाखेने झाल्टा फाटा परिसरात गणपत धोंडीराम नजन (४०) सुमन पिराजी गायकवाड आणि जगन्नाथ एकनाथ जोशी या तिघांना अटक केली. मंगळवारी रात्री १0 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला असता (एम.एच.28 डी.२५७९) या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये कडबा घेऊन चालक येत होता. यावेळी पोलिसांनी त्याला थांबवत ट्रॅक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता, त्यामध्ये कडब्याच्या खाली पोलिसांना दारूचा साठा आढळून आला.
या कारवाईत आरोपींकडून दारुसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील कारवाईत गुन्हे शाखेचे एपीआय मनोज शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहूळ यांनी सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली तर एपीआय घनशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मीरा चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव निखील खराडकर यांनी पार पाडली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou