हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारकडून लवकरात लवकर रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबतचं लोकांकडून मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यात 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबतचं आश्वासन दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या फार्मा कंपनीच्या मालकासोबत राज्याच्या आरोग्य आणि औषध प्रशासन मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिलीय. सरकारने जर रेमडेसिव्हीरसाठी परवानगी दिली नाही तर आम्ही सविनय कायदेभंग करुन लोकांना इंजेक्शन देऊ, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.
यावेळी माध्यमांतर्फे सरकारला इशारा देताना दरेकर म्हणाले, गुजरातची ब्रोफ फार्मा कंपनीच्या मालकांशी आज मी चर्चा केली. एक्सपोर्टचे डिस्ट्रिब्यूटरही आहेत. निर्यात करणारा जो माल थांबवला आहे तो माल आपल्या राज्यात विकायला परवानगी द्या. मी 50 हजार रेमडेसिव्हीर देतो असं सांगितलं आहे. या इंजेक्शनचं रोज 20 हजार उत्पादन होतं, असं फार्मा कंपनीच्या मालकाने सांगितलं आहे. याबाबत राज्य सरकारने परवानगी दिली तर रेमडेसिव्हीरच्या तुटवड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागेल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. तेही या दृष्टीने सकारात्म पाठिंबा देत आहेत. आज संध्याकाळी त्यांची बैठक आहे. मी परवानगीबाबत राजेंद्र शिंगणे यांना पत्र पाठवले आहे. गुजरात सरकारने कशा पद्धतीने परवानगी दिलीय त्याचाही दाखला मी पत्रात दिला आहे. मी मुद्दामून कंपनी मालक आणि डिस्ट्रिब्यूटरला बोलावलं आहे.
शिंगणे साहेब या खात्याचे मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचंही केंद्राशी बोलणं सुरु आहे. पण राज्य सरकारने पररवानगी दिली. शिंगणे यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. कोणत्याही अडचणी येणार नाही, अशी परवानगी द्यावी. तुम्ही परवानगी दिली नाही. तर सविनय कायदेभंग करुन आम्ही लोकांना हे इंजेक्शन देऊ. याबाबत आम्ही मंत्र्यांना कल्पाना दिली आहे. आज औषधं न मिळाल्यामुळे लोकं मरत आहेत. त्यामुळे आम्ही या विषयावर राजकारण करत नाही आहोत. याशिवाय राजेंद्र शिंगणे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ऑक्सिजन साठ्यासाठी आम्ही सरकारला पूर्ण मदत करु.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in