हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र त्यामध्ये जोखीमही तितकीच असते. मात्र स्टॉक मार्केटमधून पैसे कमावण्यासाठी संयम बाळगणे देखील महत्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य शेअर्समध्ये योग्य वेळी गुंतवणूक करणे खूप महत्वाचे असते. स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. Sunedison Infrastructure ltd चे शेअर्स देखील असेच आहेत. या कंपनीच्या शेअर्सने फक्त साडेतीन वर्षांतच गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. या कालावधीत यामध्ये 75 पट वाढ झाल्याचे दिसून आले.
भारत सरकारकडून 2027 पर्यंत देशाला झिरो कार्बन उत्सर्जन करणारा देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तेव्हापासून ग्रीन एनर्जी किंवा क्लीन एनर्जीवरील फोकस वाढला आहे. अशा स्थितीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारही ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअर्समध्ये गुंतवणूकी करण्यास प्राधान्य देत आहेत. Multibagger Stock
Sunedison Infrastructure ltd च्या शेअर्स विषयी जाणून घ्या
हे जाणून घ्या कि, BSE वर 13 ऑक्टोबर रोजी Sunedison Infrastructure ltd च्या शेअर्समध्ये 1.89 टक्क्यांनी वाढ झाली. यावेळी हे शेअर्स 440 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. 20 मार्च 2019 पर्यंत 5.82 रुपये किंमत असलेल्या या शेअर्समध्ये गेल्या साडेतीन 3 वर्षांत वाढ होऊन ते 440 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. या दरम्यान हे शेअर्स जवळपास 7460.14 टक्क्यांनी वाढले आहेत. जर साडेतीन वर्षांपूर्वी एखाद्याने या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 75.60 लाख रुपये झाले असते. Multibagger Stock
गेल्या एका वर्षात दिला 732% रिटर्न
गेल्या वर्षभरात शेअर्सच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्सने 732% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य 1 लाख 8 लाख 32 हजार झाले असते. त्याच वेळी 2022 च्या सुरुवातीपासून आतापर्यन्त या शेअर्सने गुंतवणूकदारांना 138.87 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये सुमारे 12.13 टक्के वाढ झाली आहे. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
197.56 कोटी रुपये मार्केट कॅप असलेली Sunedison Infrastructure ltd ही औद्योगिक क्षेत्राशी संबंधित एक स्थानिक कंपनी आहे. जी टाॅप सोलर कंपन्यांपैकी एक आहे. त्याची मुख्य सौर प्रतिष्ठापन कंपनी SunEdison आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sunedisoninfra.com/
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त