सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असतानाच रविवारी किंचितसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात नवे १ हजार १२६ रुग्ण आढळले तर २४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस तासात १ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली.
सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १६७ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ५७, कडेगाव ९५, खानापूर ५९, पलूस २९, तासगाव ८०, जत १४८, कवठेमहांकाळ ६४, मिरज १२०, शिराळा ९८ आणि वाळवा तालुक्यात २०९ रुग्ण आढळले.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख ९ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ हजार १७२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ९२ हजार ८७२ जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ हजार ३८० रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी १० हजार ९५४ बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.