आपले व्हॉट्सॲप सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स; काळजी घ्या, सुरक्षित रहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मॉडर्न जगामध्ये लोकं आयुष्यामध्ये आपण जेवढे महत्त्व आपल्या बाहेरील आयुष्याला देतात, तेवढेच महत्त्व आज-काल सोशल मीडियाला आणि ऑनलाईन आयुष्यालाही दिलेले पाहायला मिळते. बाहेरील सुरक्षेसोबत ऑनलाईन सुरक्षाही महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हॉट्सऍपने आपले स्थान मिळवले आहे. त्यामुळे व्हाट्सअप सुरक्षित असणे तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे. आपणही व्हॉट्सॲप वापरत असाल तर, आम्ही आपणाला व्हाट्सअप सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. याद्वारे आपणही आपले व्हाट्सअप आणखी सुरक्षित करू शकता.

आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक वापरकर्त्यांच्या टिकेला सामोरे जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअपवर असे काही फीचर्स आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण आपले अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतो. भारतामध्ये सर्वात पॉप्युलर ॲपपैकी एक ॲप व्हाट्सअप हे आहे. यूजरचे फोन नंबर सहीत, प्रोफाइल फोटो आणि स्टेटस ही माहिती एका व्हाट्सअप अकाउंट सोबत असते. व्हॉट्सॲपची सुरक्षा ग्रुपमध्ये कोण ऍड करू शकते यापासून सुरू होते. याबाबत व्हाट्सअपने ऑप्शन दिले आहेत.

व्हाट्सअपमध्ये लास्ट सीन म्हणजेच आपण व्हाट्सअप कधी शेवटी पाहिले हे दाखवले जाते. हे आपण हिडन करू शकता. आपण आपल्या अकाउंटमध्ये ठेवलेला प्रोफाइल फोटो कोणाला दिसेल याची सेटिंग करू शकता. अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपयोग करता फिंगर प्रिंट लॉक सेट करू शकतात. काही युजर्स तुम्हाला अनावश्यक मेसेज करत असतील तर त्यांना ब्लॉक करण्याचा ऑप्शनही व्हॉट्सऍप देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.