Crime News : जावयाने केला सासूचा खून; कारण ऐकून बसेल धक्का

Hingoli Son-in-law killed mother-in-law
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जावयाने आपल्याच सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे घडली आहे. या खुनानंतर आरोपीने घरातून पळ काढला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. लताबाई नागराव खिल्लारे (50) असे मृत सासूचे नाव असून आरोपीचे नाव अजय सोनावणे असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय सोनावणे हा त्याच्या पत्नीसोबत सासू लताबाई नागराव खिल्लारे यांच्याकडेच राहत होता. तो आखाडा बाळापूरच्या बाजारपेठेत हमालीचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो दारूच्या नशेत पत्नी आणि मुलीला मारहाण करायचा. रविवारी दुपारी जेवण वाढण्याच्या कारणावरुन अजयचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झालं. या भांडणावेळी सासू लताबाई यांनी मुलीची बाजू घेत जावयालाच घालून पाडून बोलण्यास सुरुवात केली. हाच राग मनात धरून अजयने शेळी बांधण्यासाठी रोवलेला खुटा उपटून सासूच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यांनतर त्याने बायको आणि मुलीलाही मारहाण केली आणि त्यानंतर तेथून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती देताच अजयच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. पोलिसांनी अधिक शोधाशोध केली असता कुर्तडी फाटा शिवारातून पोलिसांनी आरोपी जावयाला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.