धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून आईची निर्घृण हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेची छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या तिच्या मुलानेच केली आहे. या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून मुलाने हि हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अटक केलेल्या आरोपीचे नाव विशाल एलझेंडे असे आहे. हा आरोपी आपली आई उर्मिला एलझेंडे यांच्यासोबत मुंब्रा शहरातील रेतीबंदर परिसरात राहत होता. विविध कारणांवरून आरोपी विशालचे आपल्या आईसोबत नेहमी खटके उडत होते. आरोपी विशाल हा आपल्या कमाईतून पैशांची उधळपट्टी करत होता. यानंतर पैसे संपल्यानंतर तो आईच्या मागे पैशांसाठी तगादा लावायचा. आईनं पैसे न दिल्यास मायलेकात नेहमी खटके उडायचे. पण तरीदेखील मुलाची पैसे मागण्याची सवय मात्र जात नव्हती.

सोमवारी दुपारी देखील पैशांवरुन या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी विशालने रागाच्या भरात स्क्रू ड्रायव्हरने आपल्या आईच्या छातीत वार केले. हा वार इतका भयंकर होता, की त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी विशालला अटक केली. मुंब्रा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.