हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून कोरोना परिस्थितीची माहिती घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या अडचणीही त्या जाणून घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
The Opposition is united. On 20th August, Congress interim president Sonia Gandhi will speak to CMs of Congress-ruled states. Maharashtra CM Uddhav Thackeray will also take part in this meeting: Shiv Sena leader Sanjay Raut
— ANI (@ANI) August 12, 2021
दरम्यान, यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. अशी टीका संजय राऊत यांनी केली.