सोनिया गांधींचे मोदींना पत्र; देशातील ‘त्या’ मुलांना मोफत शिक्षण देण्याची केली मागणी

sonia gandhi narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून देशातील मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील कमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिलं जावं ,अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

आपणास ज्ञात आहेच, माझे पती स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशाच्या ग्रामीण भागातील युवकांना उच्च दर्जाचं, सोयीचं, आधुनिक आणि परवडणार शिक्षण मिळावं, हेच त्यांचं स्वप्न होतं. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय आहेत. आपण कोरोनानं ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमावले आहेत किंवा कमावत्या पालकाचं निधन झालेलं आहे, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं, असं पत्र सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

कोरोना महामारीच्या संकटात आपले आई-वडिल गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे. या पीडित मुलांसोबत घडलेल्या अकल्पनीय दु:खामुळे आपण राष्ट्र म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहायला हवं, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असे भावनिक पत्र सोनिया गांधींनी मोदींना लिहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.