सौरव गांगुली ‘होम क्वारंटाइन’; मोठ्या भावाला झाली कोरोनाची लागण 

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
कोलकाता । BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे मोठे भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सौरव गांगुलीने स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतले आहे.
गेले काही दिवस स्नेषाशिष यांना ताप येत होता आणि तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल बुधवारी संध्याकाळी उशिरा आला. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्नेहाशिष यांना बेले व्यू या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्यविषयक मार्गदर्शक नियमांनुसार सौरव गांगुलीलाही ठराविक कालावधीसाठी घरात क्वारंटाइन व्हावे लागणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.
स्नेहाशिष मोमीनपुर येथे वास्तव्यास होते. पण त्यांची पत्नी आणि सासरची मंडळी यांना कोरोनाची लागण झाल्याने ते सौरव गांगुली रहात असलेल्या बेहाला येथील घरात स्थलांतरित झाले होते. पण त्यांना सातत्याने ताप येत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. स्नेहाशिष हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी काही काळ बंगालच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here