“सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या स्टेटमेंटबाबत बाबत चित्र स्पष्ट करावे” – सुनील गावस्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून विराट कोहलीच्या विरोधाभासी स्टेटमेन्टबाबत फक्त सौरव गांगुलीच चित्र स्पष्ट करू शकतो, असा विश्वास महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. हा विरोधाभास कसा निर्माण झाला हे बीसीसीआय अध्यक्षांना विचारायला हवे, असे ते म्हणाले. कोहलीने टी-20 कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर बीसीसीआयने स्टार फलंदाजाला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले असल्याचे गांगुलीने म्हंटले होते. कोहलीने मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचा इन्कार केला.

गावसकर म्हणाले,”कोहलीचे स्टेटमेन्ट बहुधा बीसीसीआयसाठी नाही. मला वाटतं कोहलीला असा मेसेज कसा आला हा प्रश्न त्या व्यक्तीला विचारायला हवा. गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि हा विरोधाभास का आहे, हे त्यांना विचारायला हवे. त्याचे उत्तर फक्त तेच देऊ शकेल.” कोहलीने असेही म्हटले होते की,”निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची निवड होण्याच्या 90 मिनिटांपूर्वी त्याला सांगितले की, तो एकदिवसीय संघाचा कर्णधार नाही.” निवड समितीच्या अध्यक्षांनी कोणतीही चूक केली नसल्याचे गावस्कर यांनी म्हंट्ले.

गावसकर म्हणाले,”इथे काय वाद आहे. निवड समितीच्या अध्यक्षांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की, आता त्याच्याकडे एकदिवसीय कर्णधारपद नाही. त्यात काय चुकीच आहे. निवड समितीला तसे करण्याचा अधिकार आहे. कर्णधाराला मतदानाचा अधिकार नाही.” ते पुढे म्हणाले, “असे तर नाही की त्याला मीडियातून कळले किंवा प्रवासी विमानाच्या कमांडरने त्याची घोषणा केली, तो आता कर्णधार नाही, असे निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितले. त्यात काय चुकीच आहे. निवड समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्यात संवाद झाला होता आणि तसाच व्हायला हवा.”

भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी बीसीसीआयने स्पष्ट संवाद ठेवावा, असे गावसकर म्हणाले. “एक स्पष्ट संवाद असावा जेणेकरून कोणतीही अटकळ बांधली जाणार नाही. कोणाची निवड का झाली आणि कोणाची नाही हे निवड समितीचे अध्यक्षच सांगू शकतात. काहीवेळा, आवश्यकता नसतानाही, एक प्रेस रिलीझ जारी केले जाऊ शकते ज्यामध्ये सर्व कारणे दिली गेली पाहिजेत.

Leave a Comment