साऊथची अभिनेत्री महालक्ष्मीनं केलं दुसरं लग्न, 4 महिन्यांनी म्हणतेय की, आयुष्य खूप सुंदर आहे आणि तो…

0
216
South actress Mahalakshmi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऊथची अभिनेत्री महालक्ष्मी हि तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत दुसरं लग्न केले असून आता त्यांच्या लग्नाला चार महिने झाले आहेत. तिने चार महिन्यानंतर आपलया आयुष्यात झालेल्या बदलाबाबत सांगितलं आहे.

अभिनेत्री महालक्ष्मी कायम पती रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणारी महालक्ष्मी आता दुसऱ्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिनं आता तिच्या इन्ट्राग्रामवरून तिचे घरातील व चंद्रशेखरणसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CnJJKGEyT4u/?utm_source=ig_web_copy_link

 

महालक्ष्मी हि एक अभिनेत्री साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले असून ‘ऑफिस’, ‘थिरु मंगलम’, ‘केलाडी कनमनी’, ‘यामिरुक्का बयामेन’, ‘अरसी’, ‘वाणी रानी’ आणि ‘चेल्लामय’ या मालिकांमध्ये काम केले आहे, तर रविंद्र यांनी देखील अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

https://www.instagram.com/p/Cml-x0hStMd/?utm_source=ig_web_copy_link

महालक्ष्मीने सुरुवातीला आपलं करिअर सुरू करताना अनिल नेरेदिमिल्लीबरोबर लग्न केले. त्यावेळी अनिल याचेही एक लग्न झाके होते. दोघांना एक मुलगा देखील आहे. तिने कालांतराने आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती एकटी पडली. यावेळी तिच्या वाईट काळात निर्माता रविंदर यांनी तिची मदत केली. रविंदरने तिच्याशी लग्न केले. आता ती त्याच्यासोबत चांगले आयुष्य जगत आहे.