सोयाबीनला मिळतोय चांगला भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Soyabeen
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे.

मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी विकले होते तर सोमवारी या बाजार समितीत पुन्हा पंचवीस रुपयांची क्विंटल मागे वाढ दिसून येत आहे. 6125 रुपयांचा कमाल दर सोयाबीनला मिळालाय. सरासरी दर सुद्धा 6000 मिळाला आहे तर दुसरीकडे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा सर्वाधिक सहा हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळाला आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान दर 5750 पासून सुरू झाला. याठिकाणी सोयाबीनची दीड हजार क्विंटल पेक्षा अधिक आवक झाली होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही कमीत कमी दर 5750 एवढाच मिळाला तर सरासरी दर सहा हजार रुपये एवढा होता. याठिकाणी 794 क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. पण दर वर्षी सोयाबीन ला चार ते साडेचार हजार रुपये पर्यंत भाव मिळत आहे पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच चार ते साडे पाच हजार रुपयांपर्यंत भाव राहिला पण नंतर मात्र भाव वाढ होत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण आहे.