व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : पाटण गोळीबार प्रकरणाचं खरं कारण आलं समोर; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी ठाणे येथील माजी नगरसेवकाने तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तसेच गाडीचा झालेला अपघात यावरून वाद सुरु होता. यावेळी मदन कदम यांच्या घरी गेलेल्यांवर गोळीबार झाला. या प्रकरणातील आरोपींवर 302 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेत पाटण येथील गोळीबार प्रकरणात करण्यात आलेल्या तपासाबाबत महत्वाची माहिती दिली. यावेळी समीर शेख म्हणाले की, पाटण तालुक्यातील मोरणा खोर्‍यात रविवार, दि. १९ रोजी शिद्रुकवाडी येथे काही कारणांनी युवकाची भांडणे झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी एका गाडीचा अपघात झाला होता. त्यावरून हि भांडणे सुरु होती. हा वाद सुरु असताना काल पुन्हा गाडीच्या अडवण्यावरून भांडणे सुरु झाली.Special Offer ahuja patel electronics

यावेळी झालेलया वादावादीत यावेळी आरोपीचे साथीदार त्या ठिकाणी आले आणि यावेळी मुख्य आरोपी मदन कदम याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याला. यामध्ये दोन लोकांना गोळ्या लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी गोळ्या लागलेल्यांसोबत एक व्यक्ती घटनास्थळी उपस्थित होती. ती व्यक्ती जखमी झाली असून त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीची सध्या प्रकृती ठीक आहे.

या गोळीबार प्रकारणी मुख्य आरोपीवर 302 कलमान्वये हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे. आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयासमोर त्यांना हजर केले जाणार आहे. तसेच गावात जे काही लोक आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेण्यात आली असून गावात शांतता ठेवण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गावात सध्या शांतता असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.