प्रेम केलेल्या आणि न-केलेल्या पाखरानों.. या “लव्ह स्टोरीज” तुम्हाला प्रेमामधली सुंदर गोष्ट उलगडून दाखवतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#Valentine’s Day Special | विजय ढोबळे
सूर्याचं उत्तरायण सुरु होऊन १५-२० दिवस झाले असले तरी पुन्हा एकदा अचानक थंडी वाढल्यामुळे वातावरण एकदम कसं गुलाबी वगैरे वगैरे झालं आहे. (असं काही ठराविक वयोगटातील जनतेला वाटू लागलंय असो…). एरव्ही ओस पडलेल्या आणि शुकशुकाट असलेल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अचानक गर्दी वाढू लागली आहे. स्टारबक्स, कॅफे कॉफी डे, बरिस्ता इत्यादींनी आपापली स्पेसिअल डिस्काउंट ऑफर आणि कुपन्स केव्हाच जाहीर केली आहेत. बॉक्स ऑफिसवर येणारे काही खास कॅटेगरीतील चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंण्डिंग वर आहेत. शॉपिंग मॉल, सौंदर्यप्रसादने आणि दागिन्यांची दुकाने, चॉकलेट आणि गिफ्ट हाऊसेस यांनी उत्तम जाहिरातबाजी आणि व्यापारीकरण करण्याची एकही स्ट्रॅटेजी सोडलेली नाहीये. आणि सगळीकडे एकदम कसं छान छान सुरु आहे. अहो असणारच कि, असं काय करता प्रेमाचा महिना सुरु आहे ना. असो हे सर्व प्रेमाची प्रतिकात्मक आणि व्यापारी रूपे आपण पाहत असलो तरीही प्रेमाची दुसरीही एक सर्वोत्कृष्ट बाजू आहे आणि ती आपल्याला प्रेम या संकल्पनेवर प्रेम करायला शिकवते. अशाच काही लव्ह स्टोरीज बद्दल
माय फेव्हरेट “लव्ह बर्ड्स”…..

१) मोहब्बत रूह से होती है जनाब…जिस्म से नहींUntitled design

सुंदरतेची परिमाणे ओलांडून माणसातील सौंदर्य शोधणारी जोडी म्हणजे आलोक दीक्षित आणि लक्ष्मी यांची हि गोष्ट. ऍसिड हल्ल्याचा बळी झालेल्यांसाठी कानपुरमध्ये एक मोहीम चालवत असताना आलोक आणि लक्ष्मी एकमेकांना सर्वप्रथम भेटले. लक्ष्मीचा आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती, आनंदी स्वभाव या सर्व गोष्टींनीं आलोक खूप प्रभावित झाला. पुरुषांवरील विश्वास उडालेल्या लक्ष्मीलाही आलोकचं संवेदनशील असणं जास्त आवडलं आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते सोबत राहू लागले. पुढे त्यांना पिहु नावाची एक गोंडस मुलगीही झाली. ऍसिड हल्ला झाल्यानंतर लक्ष्मी धैर्याने स्वतःला सावरत गुन्हेगारांविरोधात कायद्याची लढाई लढली. २०१४ साली लक्ष्मीला मिशेल ओबामा यांच्या हस्ते “इंटरनेशनल वुमन ऑफ करेज” हा पुरस्कार मिळाला. पत्रकार असलेला आलोक आणि लक्ष्मी दोघेही आता ऍसिड हल्ला पीडितांसाठी काम करतात. त्वचेची सुंदरता पाहून प्रेम करणाऱ्या आजच्या जगात अनेक संवेदनशील तरुण-तारुणींसाठी आलोक आणि लक्ष्मी दोघेही प्रेमाची मिसाल आहेत.

२) “Commitment” Is Not Just A Word…Untitled design

आजच्या काळात जिथे तरुण-तरुणी कपडे बदलल्यासारखे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड बदलतात तिथे “कमिटमेंट” किंवा “वचनबद्धता” याला खूप मोठा अर्थ प्राप्त होतो. अशाच एका “कमिटमेंट” ची हि गोष्ट. तृप्ती आणि शशी. शशी हा आर्मीमध्ये मेजर या पदावर ऑफिसर होता. या दोघांची भेट घडवली ती त्यांच्या एका म्यूचुअल फ्रेंड्सने. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये प्रेम झाले आणि पुढच्या सहा महिन्यांनी दोघांची “Engagement” पण झाली. कुणालाही हेवा वाटेल एवढी यांच्या प्रेमाची सुरुवात शानदार झाली होती. पण पुढील प्रवास दोघांच्याही प्रेमाची परिक्षा घेणारा होता. “Engagement” नंतर ८ महिन्यांनीच तृप्तीला “मल्टिपल आर्टिरियोसेलेरोसिस” हा आजार झाला आणि तिचं संपूर्ण शरीर अपंग झालं. व्हिलचेयर शिवाय पर्याय उरला नाही. कठीण परिस्थिती हि नेहमी माणसाचं चारित्र्य तपासत असते. आता इथे मेजर शशी नायरच्या प्रेमाची आणि प्रमाणिकपणाची परीक्षा होती. अनेकांनी “Engagement” तोड असा “प्रॅक्टिकल” सल्लाही दिला. पण इथे त्याची कमिटमेंट आणि प्रामाणिकपणा श्रेष्ठ ठरला आणि २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. यानंतर तृप्तीला अजून एक अटॅक आला आणि तिचं कंबरेखालील शरीर पैरालाइज झालं. या काळात शशीने तृप्तीला शारीरिक आणि मानसिक दोन्हीही बाबतीत आधार द्यायला कुठलीच कमतरता ठेवली नाही. शशी तृप्तीला आर्मी हॉस्पिटल मध्ये घेऊन येताना नेहमीच लोकांना दिसायचा. दोघांमधील प्रेम पाहून लोकानांही त्याचा अभिमान वाटायचा. पैरालाइज झाल्यानंतरही दोघांनी आनंदी जीवन जगण्याचा एकही क्षण वाया घालविला नाही. तृप्तीला व्हिलचेयर बसवून दोघेही पार्टीला, फिरायला जायचे. परंतु नियतीला हे मान्य नसावं. १२ जानेवारी २०१९ ला पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर गस्त घालताना आयईडी च्या स्फोटामध्ये मेजर शशी नायर शहीद झाले. मेजर शशीने तृप्तीला दिलेले वचन आणि साथ शेवटपर्यंत सोडली नाही. आज मेजर शशी नायर नसले तरीही तृप्ती आणि शशी यांच्यामधील प्रेम नेहमीच जिवंत राहील.

३) Never Judge A Book By It’s CoverUntitled design

आजच्या समाजाला एक वाईट सवय लागली आहे आणि ती म्हणजे कुठल्याही गोष्टीची संपूर्ण माहिती नसताना दुसऱ्यांविषयी लगेचच आपलं मत बनविणे. आणि मग लोकं इथेच माती खातात. अशीच माती लोकांनी या फोटोच्या बाबतीत खाल्ली. मागील दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांचे बरेच फोटो खूप व्हायरल झाले. अनेकांनी ट्रोलही केलं. “चांगल्या झाडावर नेहमी माकडंच चढतात”, “चुल्लू भर पाणी में डूब मरो” अशाही कमेंट आल्या. पण कुणालाही त्या दोघांबद्दल खरी माहिती नव्हती. वरती फोटोमध्ये सावळ्या रंगाचा मुलगा सर्वसाधारण जरी दिसत असला तरी त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. तुम्हीही माती खाल. तो तेव्हढा सर्वसाधारण नाही. या दोघांच नाव आहे एटली कुमार आणि कृष्णा प्रिया. एटली कुमार हा साऊथ चित्रपटांचा डायरेक्टर और स्क्रीनप्ले-राइटर आहे आणि कृष्णा प्रिया हि टीव्ही एक्ट्रेस आहे. एटली कुमार ने ‘राजा रानी’, ‘Nanban’, ‘Sangili Bungili Kadhava Thorae’ यांसारखे साऊथ बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारे चित्रपट बनविले आहेत. ते दोघेही आठ वर्षांपासून रिलेशनशिप होते. २०१४ मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला बॉलिवुड, टॉलिवूड आणि साउथ इंडिया मधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. आपण वर्णद्वेषी नसलो तरीही आपल्याकडे त्वचेच्या रंगाला विनाकारण जास्त महत्व दिलं गेलंय.

४) “लव्ह- अमेरिका टू इंडिया व्हाया फेसबुक”Untitled design

अमेरिकेमध्ये राहणारी ४१ वर्षांची एमिली आणि अहमदाबादच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा २३ वर्षांचा हितेश. प्रेम हे भाषा, प्रांत आणि सीमा यांच्यापालिकडे असतं असं म्हणतात ते या दोघांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि हे सिद्ध करून दाखविण्यामध्ये महत्वाचा वाटा होता तो म्हणजे “फेसबुक” दादा आणि “गुगल” गुरुजींचा. एमिली आणि हितेश दोघेही एकमेकांचे फेसबुकवर मित्र झाले. मित्र झालेत म्हंटल्यावर गप्पा होणारच. पण इथे एक अडचण होती ती म्हणजे भाषेची. हितेशला हिंदी सोडून दुसरी भाषा येत नव्हती आणि एमिलीला हिंदी समजत नव्हती. मग आता इथे दोघांची मैत्री टिकली पाहिजे म्हणून त्यांच्या मदतीला “गुगल” गुरुजी धावून आले. गुगल ट्रान्सलेटर च्या मदतीने हितेश हिंदी टू इंग्रजी ट्रान्सलेट करून पाठवायचा आणि एमिली जे म्हणतेय ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून समजून घ्यायचा. अशाप्रकारे दोघांनींही भाषेवर मात करून आपल्या प्रेमाची गाडी “अमेरिका टू इंडिया व्हाया फेसबुक” अशी दाबंटली आणि प्रवास सुरु झाला “Love Beyond The Boundaries” चा. अमेरिकेत आरोग्य समन्वयक असलेल्या एमिलीने प्रेमाच्या ओढीने एक दिवस आपली बॅग भरली आणि थेट अहमदाबादच्या झोपडपट्टीतील गल्ली गाठली. तिथे हितेश आणि एमिली पहिल्यांदा एकमेकांना भेटले. एमिलीला हितेशचा साधेपणा प्रचंड आवडला. दोघांनी त्याच दिवशी हिंदू विवाह पद्धतीने लग्न केलं. हितेशच्या घरच्यांनींही एमिलीला आपली सून म्हणून प्रेमाने स्वीकारलं. लग्नानंतर दोघेही अमेरिकेला “हनिमूनसाठी” जाऊन आले. आता दोघेही भारतात राहतात.

५) मित्रो… प्यार अंधा नहीं होताUntitled design

प्रेम आंधळं असतं असं नेहमीच म्हंटल जातं पण ते अंतिम सत्य नाही. व्यक्तींमधील प्रामाणिकपणा पाहण्याची दृष्टी प्रेम नेहमीच तुम्हाला देत असतं फक्त तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम आणि आनंद ठरवायचा असतो. अशीच एक डोळस आणि चेतनादायी गोष्ट आहे पाकिस्तानमधील अदनान आणि महावैष यांची. अदनान हा अंध आहे परंतु त्याच्यामधील प्रामाणिकपणा, सच्चाई आणि निर्धार या गोष्टी महावैषला अदनान वर प्रेम करण्यासाठी पुरेशा होत्या. अदनानच्या आयुष्यात अंधार असला तरीही महावैष त्याच्या आयुष्यात प्रेमाचा प्रकाश घेऊन आली होती. “प्रामाणिकपणा हि अशी गोष्ट आहे की जी सर्वांकडे नसते आणि ती मला अदनानमध्ये दिसली” असं महावैष सांगते. अदनान हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून दोघांची भेट सर्वप्रथम एका वर्कशॉपमध्ये झाली. आणि इथेच दोघांना प्रेमाचा शॉकही बसला. अदनान आणि महावैष यांच्या प्रेमाला दोघांच्याही घराच्या मंडळींनी जोरदार विरोध केला. परंतु दोघांनीही माघार घेतली नाही. दोघांनी एक दुसऱ्याच्या घरच्यांची समजूत काढली आणि दोघांनी लग्न केलं. कितीही अवघड परिस्थती आली तरीही एकेमकांची साथ कधीच सोडणार नाही अशी शपथ घेतली. अदनानला डोळे नसले म्हणून काय झालं. अदनान आणि महावैष दोघांकडेही त्यांच्या उज्वल भविष्याची स्वप्ने आहेत.
आपण एकटे संपूर्ण जग बदलू शकत नाही परंतु आपण कुणा एका व्यक्तीसाठीचे जग नक्की बदलू शकतो. आणि ते बदलण्याची ताकद प्रेमात आहे. प्रेम हे फक्त लाल किंवा गुलाबी रंगाचे नसते. प्रेमाच्या अनेक छटा आहेत. त्यातील फक्त काही छटा इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रेमाचा उपयोग कुणाचंतरी आयुष्य “Bitter” करण्याऐवजी “Better” करण्यासाठी करूयात. सर्वांना प्रेमदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Vijay Dhobale

विजय ढोबळे
7709082025
(लेखक हे मुक्त पत्रकार असून ते “विचारवेध” या स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करतात)

इतर महत्वाचे –
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी
“हिरवट डोळ्यांची ती मुलगी जिने जगाला बंदिवान बनविले होते.”
याच फोटोमुळे त्याने आपण त्या मुलीला काहीच मदत करू शकलो नाही या अपराधी भावनेतून आत्महत्याही केली..

1 thought on “प्रेम केलेल्या आणि न-केलेल्या पाखरानों.. या “लव्ह स्टोरीज” तुम्हाला प्रेमामधली सुंदर गोष्ट उलगडून दाखवतील”

  1. Nice article…
    मेजर शशी नायर यांच्या बद्दलची ही extra माहिती खूप महत्वाची समजली…. ते खऱ्या अर्थाने सीमेवर आणि सार्वजनिक आयुष्यात हीरोच ठरलेत.
    जय हिंद…!!

    Reply

Leave a Comment