Saturday, March 25, 2023

महात्मा गांधींच्या ‘त्या’ खास चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

- Advertisement -

लंडन । भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी घातलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलाव ब्रिटनमध्ये होणार आहे. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये सांगितली जात आहे. महात्मा गांधीच्या चष्म्याच्या जोडीचा 21 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव होत असून अनेक ग्राहकांना या चष्म्याने आकर्षित केले आहे. भारतीयांना या चष्म्याच्या खरेदीसाठी उत्साह आहे.

लिलावकर्त्यानी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती,असे लिलावकर्त्याने सांगितले.

- Advertisement -

दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित ‘ईशान्य ब्रिस्टल ऑक्शन’ कंपनीने रविवारी सांगितले की, त्यांच्या पोस्टमध्ये असलेल्या चष्म्याच्यामागे इतका गौरवशाली इतिहास असू शकतो हे जाणून आम्हाला आश्चार्य वाटले. लिलाव करणार्‍या कंपनीच्या अ‍ॅन्डी स्टो म्हणाल्या, चष्म्याला मोठा सुवर्ण इतिहास आहे. इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे महात्मा गांधींचे हे चष्मे होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”