वीकेंड लाॅकडाऊनला कराड शहरासह ग्रामीण भागात उत्फूर्त प्रतिसाद

पोलिसांचा चोख बंदोबस्त,  कोट्यावधीची बाजारपेठ बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वीकेंड लाॅकडाऊनला कराड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून कोट्यावधीची उलाढाल असलेली कराडची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला होता. 

जिल्ह्यासह कराड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे शनिवारी आदेशाचे पालन करताना लोक प्रतिसादही पहायला मिळला. यावेळी शहरात चाैका- चाैकात तसेच मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त होता. ये- जा करणाऱ्या प्रत्येकांची कसून चाैकशी पोलिस करत होते.

वीकेंड लाॅकडाऊनमुळे शहरातील वाहतूक तुरळक अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असताना दिसली. तर महामार्गावरील वाहतूकीवरही या लाॅकडाऊनचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील दुकाने, मेडिकल सुरू असतानाही तेथेही लोकांचे प्रमाण फार कमी प्रमाणात दिसून आले. शहरातील रस्ते निरमनुष्य होते. त्यामुळे कराडसह तालुक्यात वीकेंड लाॅकडाऊनला चांगलाच प्रतिसाद पहायला मिळाला.

बसस्थानकांत शुकशुकाट

वीकेंड लाॅकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची ये- जा शहरात कमी झालेली आहे. त्यामुळे कराड बसस्थानकांत कोणीच नव्हते. बसस्थानकात लाॅकडाऊनमुळे शांतता व शुकशुकाट असल्याचे चित्र पहायला मिळाले.

You might also like