राष्ट्रीय महामार्गावर उंब्रजजवळ अपघातात क्रिडा शिक्षकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर कारखाना शाळेचे क्रीडा शिक्षक मानसिंग शिंदे यांचे अपघाती निधन झाले. राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज हद्दीत ट्रक व दुचाकीचा हा झाला. मानसिंग शिंदे यांच्या निधनाने हनुमानवाडी गावासह परिसरावर शोककळा पसरली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सह्याद्री साखर कारखाना यशवंतनगर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय क्रीडाशिक्षक मानसिंग शिंदे (वय- 54, रा. हनुमानवाडी) यांचे अपघाती निधन झाले. मानसिंग शिंदे हे कराड- पाटण तालुका माध्यमिक शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेचे संचालक होते. तर पुणे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन होते. याच बरोबर एनसीसी ऑफिसर तसेच वेटलिफ्टिंगचे कोच म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आजपर्यंत राष्ट्रीय खेळाडू घडवले असून तालुका जिल्हा व राज्य पातळीपर्यंत विविध स्पर्धांमध्ये ते हिरीरीने सहभागी होत असत. त्यांचा सर्वच क्षेत्रातील मोठा मित्र परिवार आहे आहे..

राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास उंब्रज गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मानसिंग शिंदे गंभीर जखमी झाले होते, त्यांना तात्काळ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रात्री 1 वाजता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने यशवंतनगरसह हनुमान वाडी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Leave a Comment