नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारतात रशियन कोरोना लस स्फुटनिक व्हीला परवानगी मिळाली आहे. या लसीच्या आपात्कालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
भारतात हैदराबाद मधील फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सोबत भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे.
या लसीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. 1 एप्रिल रोजी या लसीला परवानगी नाकारण्यात आली होती. या लसीबाबत आणखी माहिती देण्याची मागणी भारतीय औषध महानियंत्रक मंडळाच्या तज्ञ समितीने डॉक्टर रेड्डी यांच्याकडे केली होती. आता तज्ञ समितीने या लसीचा आपात्कालीन वापराला परवानगी दिली आहे.
Subject Expert Committee approves Dr Reddy's application for emergency use authorisation to Sputnik V: Sources#COVID19 pic.twitter.com/U2wsCQTNY0
— ANI (@ANI) April 12, 2021
ही समिती आता भारतीय औषध महानियंत्रक मंडळाला आपला निर्णय सांगणार आहे. त्यानंतर डीसीजी आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मागेल आणि त्यानंतर ही लस भारतात दिली जाईल.
दरम्यान ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्ट महिन्यात करण्यात आली आहे. रशियाने सर्वात प्रथम याला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ही लस नागरिकांना द्यायला सुरुवात झाली. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागतो. त्यानंतर 28 ते 42व्या दिवसानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुरुवात होते. भारतात आतापर्यंत या लसीच्या 1500 जणांवर चाचण्या झाल्या आहेत.
भारतात सध्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ची कोविडशिल्ड आणि भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सीन अशा लसी देण्यात येत आहेत. भारतात आतापर्यंत लसीकरणाने दहा कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता या रशियन नव्या लसीमुळे आणखी नागरिकांना लस देण्यात येईल. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा