लॉकडाऊनची शक्यता असली तरी गुढीपाडव्याला परवानगी : ठाकरे सरकारकडून ‘हि’ खास नवी नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे.

मराठी नवीन वर्ष उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजर केल जाणार आहे. पण, यंदाच्या वर्षीही गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे. सरकारच्या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.

राज्य सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. त्या, पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे, कोरोनाचं सावट यंदाच्या गुढी पाडव्याच्या सणावरही आहे. त्यासाठीच, सरकारने गुढी पाडवा साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

नियमावलीतील ‘या’ महत्वाच्या सूचना…

१) गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करा
मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो.

२) शोभा यात्रा, बाईक मिरवणुका काढू नका
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

३) आरोग्यविषयक उपक्रम परवानगीनेच
गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.

४) वेळेची मर्यादा पाळा
सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या प्रमाणात गेल्या वर्षी पेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडवा हा सण कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्ट्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून संध्याकाळी 8.00 वाजेण्यापुर्वी साजरा करणे अपेक्षित आहे.

५) सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करुन तसंच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येत असतो. कोविड- 19 या विषाणूचा वाढता फैला रोखण्याच्या दृष्ट्टीने यार्षी गुढीपाडव्यावनिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फे री, बाईक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.

६) सोशल डिस्टिंगचे पालन करा
सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा 5 लोकांनी एकत्र न येता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारुन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

You might also like