डेव्हिड वॉर्नरचा महापराक्रम; ५० अर्धशतक करणारा पहिलाच खेळाडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला असला तरी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोठा भीमपराक्रम केला आहे. या सामन्यात अर्धशतक करताच डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासात ५० अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. वॉर्नरने या सामन्यात मनिष पांडेसह शतकी भागीदारी करताना संघाचा डाव सावरला होता. तरीही हैदराबादचा पराभवचा झाला.

दरम्यान यंदा हैदराबादच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक अशी राहिली आहे. आतापर्यंतच्या झालेल्या ६ सामन्यात केवळ एकच विजय मिळवण्यात हैदराबादला यश मिळाले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.