खेळला वॉर्नर आणि ट्रोल झाली काव्या मारन! काय आहे नेमका प्रकार?

David Warner and kavya maran
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा यंदाचा सिझन मोठ्या प्रमाणात गाजत आहे. कारण यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंतच्या आयपीएलमधील सक्सेसफुल टिमा पूर्णपणे फ्लॉप होताना दिसत आहेत तर नवीन टिमा दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. पण कालच्या हैद्राबाद आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्यात खेळाडूंच्या खेळीपेक्षा आयपीएल संघाच्या मालकांची. त्यांच्या रिएक्शनची आणि त्यांच्या सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.

काय आहे प्रकरण ?
हैद्राबादचा माजी कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) सध्या दिल्लीच्या संघातुन खेळताना दिसत आहे. मागच्या आयपीएलमध्ये डेविड वॉर्नरच्या (David Warner) खराब फॉर्ममुळे त्याला आपले कर्णधारपद सोडावे लागले आणि त्यानंतर त्याला टीममधील स्थानदेखील गमवावे लागले. यामुळे हैद्राबादच्या टीम मॅनेजमेंटने त्याला यंदाच्या सीझनमध्ये रिटेन केले नाही. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीच्या संघाने डेविड वॉर्नरला आपल्या संघात सामील करून घेतले. कालच्या सामन्यात डेविडनं तडाखेबंद फलंदाजी केली. अवघ्या 58 चेंडूत 92 धावांची खेळी डेविडनं केली. नॉट आऊट राहिलेल्या डेविडच्या खेळीनं दिल्लीनं हैदराबादवर 21 धावांनी दणदणीत विजय मिळवला. असं असूनी सध्या डेविडपेक्षाही चर्चा रंगली आहे ती हैदराबादच्या काव्या मारनची. या सामन्यानंतर काव्या मारनला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

काव्या मारन सनरायजर्स हैद्राबाद संघाच्या मॅनेजमेन्ट टीमचा प्रमुख भाग आहे. या संघानं डेविड वॉर्नरला यंदाच्या ऑक्शनमध्ये सोडलं होतं. 2016 साली डेविड वॉर्नरला (David Warner) कॅप्टन्सीसाठीही हैदराबादकडून खेळताना गौरवण्यात आलेलं. गेल्या वर्षापर्यंत हैदराबादकडून खेणाऱ्या डेविडनं दिल्लीत एन्ट्री केली. दिल्लीच्या संघात येताच डेविडनं हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत सगळ्यांना आश्चर्यचकीत केले आहे. दिल्लीनं डेविड वॉर्नरसाठी दिल्लीनं 6.25 कोटी रुपये मोजले आहेत. आपल्यावरचा विश्वास डेविडनं सार्थकी ठरवला आहे. त्याची प्रचिती कालच्या सामन्यात आली. मात्र डेविड वॉर्नर कालच्या सामन्यातील खेळीपेक्षा काव्या मारनला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

हे पण वाचा

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं; कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

शरद पवारांवर हल्ला करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला अटक ; आता नेमकं कारण काय?

जगातील तिसरे उंच शिखर : कांचनजंगा मोहिम गिर्यारोहक प्रियांका मोहितेकडून फत्ते

संभाजीराजे छत्रपतींचं अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी करणार राजकीय भूमिका जाहीर

पक्कं ठरलं! ‘कॉफी विथ करण’चा नवा सीजन येणार; पहिल्याच भागात ‘हे’ कलाकार झळकणार