खळबळजनक!!! श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात अटक; बलात्काराचा आरोप

srilanka cricket
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रलियात T 20 विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच क्रिकेट विश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज धनुष्का गुणथिलका याला ऑस्ट्रेलिया पोलिसानी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

एका महिलेच्या तक्रारीवरून दानुष्का गुनाथिलकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे 1 वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल. एका 29 वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, गुणथिलकाने घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवस दनुष्का गुनाथिलकाशी चॅट केले होते. त्यांनतर बुधवारी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्याच्यावर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे .

यापूर्वी 2018 मध्ये गुणतिलका अशाच एका घटनेत अडकला होता. त्यानंतर श्रीलंकन ​​क्रिकेटने त्याला गैरवर्तनासाठी निलंबित केले होते. श्रीलंकेत नॉर्वेजियन महिलेचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुणतिलाका आणि त्याच्या मित्राची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी गुणतिलकाचा सहभाग फेटाळून लावला होता. पोलिसांनी त्यांना सोडले होते, परंतु त्यांच्या मित्राला अटक करण्यात आली होती.

दानुष्का गुनाथिलकच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास त्याने आत्तापर्यंत 8 कसोटी सामन्यांमध्ये 18.69 च्या सरासरीने एकूण 299 धावा केल्या आहेत. 47 एकदिवसीय सामन्यात त्याने 35.58 च्या सरासरीने एकूण 1601 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने 46 टी20 सामन्यांच्या 45 डावांमध्ये 741 धावा केल्या आहेत.