मविआचे 12 ते 13 आमदार संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर आता महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा गौप्यस्फोट केला. तसेच मध्यावधी निवडणुकीची शक्यता त्यांनी यावेळी फेटाळून लावली. मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 आमदार शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे, असा दावाच उदय सामंत (uday samant) यांनी केला आहे.

विरोधकांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही – विजय शिवतारे
राज्यात असणारे भाजप शिंदे गटाचे सरकार हे केव्हाही कोसळणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येतं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे उपनेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले ‘विरोधक हे दिवा स्वप्न पाहत आहेत. ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून पवार साहेब हे राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत. त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कदापि पूर्ण होणार नसल्याचे शिवतारे यांनी म्हंटले आहे.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी