ST बस पुलावरून नदीत कोसळली; भीषण अपघातात 12 ठार, काही बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंदोर हुन जळगावकडे निघालेल्या बसला मध्यप्रदेशच्या धार येथे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस 100 फूट उंचीवरून नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र महामंडळाची ही बस सकाळी 7:30 ला इंदोर हुन अमळनेर कडे निघाली होती. काही तांत्रिक बिघाडामुळे बस खलघाट संजय सेतू पुलावरून थेट 100 फूट खाली नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यु झाला असून काही लोक बेपत्ता आहेत. सध्यस्थितीत स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अनेक जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे.

बसमध्ये एकूण किती लोक प्रवास करत होती ?? तसेच अपघाताचे नेमकं कारण काय ? हे अद्याप समोर आलं नसलं तरी ५०-५५ आसन क्षमता असलेल्या या बस मध्ये महाराष्ट्रातील अनेक जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी कुमार पुरषोत्तम आणि एसपी धरमवीर सिंहही घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment