हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बस आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तब्बल ३० जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
माहितीनुसार, गॅस वाहतूक करणारा टेम्पो भराडीकडून सिल्लोडला येत होता तर बस सिल्लोडकडून पाचोराकडे निघाली होती. त्याचवेळी संध्याकाळी ६ च्या सुमारास वांगी फाट्याजवळ बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की गॅस वाहतूक करणाऱ्या ट्र्कचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात १ जणांचा मृत्यू झाला असून ३० हुन अधिकजण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आल्यांनतर पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील वाहतूक सुरळीत केली.