रात्री उशिरा गावी जायला नव्हती एसटी नंतर एकाने असा काही पराक्रम केला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर | गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची मोठी अडचण असते. मोठ्या शहरांपासून गावाकडे यायला फार कमी वाहने उपलब्ध असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. लातूर मधील एका गावामध्ये रात्री जाण्यासाठी एसटी बस नव्हती, म्हणून एका तरुणाने बस स्थानकातून एक एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील औराद शहाजानी बसस्थानकातील ही एक घटना आहे. शेळगी गावात तरुणांना रात्री उशिरा जाण्यासाठी एसटी नव्हती. म्हणून गावातील तरुणांनी दारूच्या नशेमध्येमध्ये एसटीच पळून नेली. एसटी पळवताना विजेच्या 2 खांबांना या एसटीने जोराची धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या आणि एक विजेचा खांब देखील खाली पडला. एसटी बस स्थानकावर नसल्याचे समजताच झोपलेल्या बस चालक आणि वाहकानी पोलिस ठाणे गाठले.

एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. औराद पोलिसांनी शोध सुरू केला. शेवटी शेळगी गावात त्यांना बस सापडली. एसटीचं 25 हजारांचे नुकसान झाले आहे. अजून कोणीही FIR दाखल करण्यासाठी तक्रार दिली नसल्यामुळे तरुणांवर कोणताही गुन्हा अजूनपर्यंत दाखल केला गेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment