हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलक तरुणांवर पोलिसानी केलेल्या लाठीचारामुळे राज्यात वातावरण चांगलंच पेटलं आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलं असून ठिकठिकाणी रास्ता रोको, गाड्यांच्या तोडफोडीची प्रकरणे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस (ST Buses0 बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून औरंगाबाद, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
जालना लाठीचार्ज प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी या घटनेचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यातून छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये ६०० एसटी बस सोडण्यात येतात.परंतु महामंडळाने एसटी बसेस रद्द केल्यामुळे प्रवासांशी मोठी गैरसोय झाली आहे. पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. परंतु बसेस रद्द करण्यात आल्याने या सर्व प्रवाशांचा हिरमोड झाला असून आता खासगी गाड्याने प्रवास करावा लागेल.
आज सकाळपासून सोलापूर, जालना, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, अवसाकडे जाणारी एकही बस पुण्यातून सुटलेली नाही. रोज तेरा ते पंधरा हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. त्यातच भर म्हणजे आज रविवार असल्याने अनेक जणांना सुट्टी असते. सुट्टीमुळे अनेक प्रवासी बस स्थानकावर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत मात्र बस नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस पुन्हा कधी सुरु होणार याबाबत अजुन कोणतेही अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून मिळत नाही.