ST च्या तिकीट दरात मोठी वाढ; दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल कीआपणा सर्वांना सुट्ट्यांची आस लागते आणि बाहेर फिरायला जाण्याची प्लॅनिंगही सुरु होते. त्यामध्ये सर्वात आरामदायकत प्रवास हा ST चा असतो. परंतु सणासुदीच्या या काळातच ST च्या तिकीट दरात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. त्याचे दर कमी होते ना होते ते आता ST महामंडळाने एन दिवाळीच्या तोंडावर भाड्यात 10 टक्क्यांची वाढ केली आहे. ही दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ या सूत्रानुसार केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे.

7 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत होणार लागू

एसटीकडून करण्यात आलेल्या या भाडे दराची अंमलबजावणी ही येणाऱ्या 7 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे पाहिले तिकीट होते तेवढाच दर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या प्रवाश्यानी आधीच तिकीट बुक केले आहे. त्यास तिकिटाची राहिलेली रक्कम  ज्यावेळी प्रवास होईल त्यावेळी वाहकाकडे भरावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. यातच एसटी महामंडळ दिवाळीच्या मुहूर्तावर जास्तीच्या गाड्या सोडणार आहे. यांमध्ये गर्दी ही प्रचंड असल्यामुळे खाजगी बसेस याचा फायदा घेत जास्तीचे पैसे घेऊन लोकांच्या खिशाला कात्री लावतात ते वेगळेच. त्यामुळे नागरिकांची एन सणासुदीला चांगलीच कोंडी झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.