परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय! बीड आणि लातूरला जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द

ST
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूर, बीड भागातील वातावरण तापले आहे. या भागात मराठा आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. त्यामुळे पुणे परिवहन मंडळांकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने पुण्यातील शिवाजीनगर आगारातून बीडला जाणाऱ्या 9 आणि लातूरला जाणाऱ्या 9 अशा दिवसभरातील एकूण 18 फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असल्यामुळे मराठा बांधवांनी आक्रमकची भूमिका घेतली आहे. अनेक भागात पुढारी नेत्यांच्या आणि खाजगी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. इतकेच नव्हे तर, काही भागात एसटीच्या काही गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून एसटी प्रशासनाने लातूर आणि बीडला जाणारी बस सेवा बंद केली आहे. आज दिवसभरात बीडला जाणाऱ्या 9 आणि लातूरला जाणाऱ्या 9 अशा एकूण 18 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागात जाणाऱ्या प्रवाशांना वेगळा पर्याय शोधावा लागत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणानंतर राज्यात साखळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरला असताना ही सरकार ठोस निर्णय घेत नसल्यामुळे मराठा बांधवांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अनेक गावात राजकिय पुढार्‍यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. परंतु असे असताना देखील जे जे नेते गावात गेले त्यांच्या गाड्या फोडण्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.