मलेशियाला तस्करीसाठी पाठविण्यात येत असलेली 20 कोटी रुपये किंमतीची स्टार कासवं कस्टम टीमकडून जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील विमानतळांवर सोन्याची, ड्रग्जची अवैध तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र तस्कर इतरही काही बंदी असलेल्या वस्तूंची छुप्या मार्गाने गुपचूप तस्करी करून कस्टम्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच चेन्नई एअर कार्गोचे ताजे प्रकरण समोर आले आहे.

सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका निर्यात करण्यात येत असलेल्या कन्‍साइनमेंट मधून 1364 स्टार कासवं जप्त केली आहेत. या संकटग्रस्त कासवांना लपून मलेशियाला पाठवले जात होते. या प्रजातींना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापैकी काहींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 20 कोटी एवढी आहे.

सीमाशुल्क विभागाच्या दिल्ली मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,”चेन्नई कार्गोमधून एक कन्‍साइनमेंट मलेशियाला पाठवला जात होता. कस्टम टीमही याबाबत पूर्णपणे सतर्क होती. या टीमने चेन्नई एअर कार्गोमधून 1364 स्टार कासवं जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांची किंमत 20 कोटी रुपये आहे. कार्गो कस्टमने जप्त केलेली स्टार कासवेही ताब्यात घेतली आहेत, ज्यांना पुनर्वसन आणि पुढील तपासासाठी तामिळनाडू राज्य वन विभागाकडे सुपूर्द केले गेले आहे.

Leave a Comment