…हा तर पंजाबचा अपमान, भाजपने राजकारण करणे बंद करावे; नवज्योतसिंह सिद्धू यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करत पुन्हा भटिंडा विमानतळावर गेले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर टीका केली. यावरून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचे सांगणे हा राज्याचा अपमान आहे. त्यामुळे भाजपने राजकारण करणे बंद करावे,” असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ते मार्गाने जाण्याचे नियोजन अचानक का करण्यात आले ? फिरोजपूरमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळेच हे संपूर्ण नाटक रचण्यात आले. 70 हजार खुर्च्या आणि फक्त 500 लोक होते.

पंजाबमध्ये भाजपला समर्थक नाहीत. पंजाबमध्ये भाजप पूर्णपणे उघडी पडली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या दौऱ्यावेळी जी काही घटना घडली. यावरून भाजपडून जे राजकारण केले जात आहे. ते आता भाजपने बंद करावे. पंजाबमध्ये लोकांनी भाजपला नाकारले आहे. पंजाबमध्ये राष्ट्रपती शासनाचा मुद्दा उपस्थित करणारे भाजपचे पोपट आहेत.

पंतप्रधान महोदय तु्म्ही केवळ भाजपचे नाही तर सर्वांचे पंतप्रधान आहात. तुमच्या जीविताची किंमत देशातील प्रत्येक लहान मुलही जाणते. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचे तुम्ही म्हणालात. हा या राज्याचा पंजाबियतचा अपमान आहे, असे सिद्धू यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment