हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नोकऱ्यांची अवस्था पाहता आपला स्वतःचा एक व्यवसाय असावा असेच प्रत्येकाला वाटत असते पण काहीवेळा पैशांच्या अडचणींमुळे म्हणा किंवा कोणता व्यवसाय करावा याची योग्य कल्पना नसल्यामुळे लोकं व्यवसाय करण्यास जास्त रस घेत नाहीत. पण आज आपण अशा एका व्यावसायाच्या कल्पनेबाबत चर्चा करणार आहोत ज्याद्वारे आपल्याला कमी पैशांत भरपूर नफा मिळू शकेल. होय हा व्यवसाय आहे पेन चा
या व्यवसायासाठी आपल्याला जास्त लोकांची गरज नाही. आपल्या कुटुंबातील 4-5 लोकं मिळूनही हे काम करू शकतील. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5-6 लहान मशीन्सची गरज असेल. या मशीन्स फारश्या महागड्या नाहीत. तसेच आपल्याला त्या कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून देखील सहज ऑर्डर करता येईल आणि या मशीन्सला वॉरंटीही मिळते.
या मशीन्सच्या मदतीने आपल्याला एका दिवसात 10,000 पेन बनवता येतील. एक पेन बनवण्यासाठी 1 रुपयापेक्षा जास्त खर्च येत नाही. . या व्यवसायामध्ये सुरुवातीला सुमारे 20,000 रुपयांची गुंतवणूक लागेल आणि याद्वारे आपल्याला दरमहा 50-60 हजार रुपयांची कमाई करता येऊ शकेल. या व्यवसायासाठी आपल्याला फक्त एडॉप्टर फिटिंग मशीन, इंक फिलिंग मशीन, नोजल फिटिंग मशीन, सेंट्रीफ्यूगल मशीन आणि पेन रायटिंग मशीन्सची गरज भासेल.
पेनाची विक्री करण्यासाठी सुरुवातीला भलेही आपल्याला ग्राहक मिळवण्यास नक्कीच वेळ लागेल, मात्र जसजशी आपली मार्केटमध्ये पोहोच वाढेल तसतसे आपले काम आणखी सोपे होईल. आपण आपले पेन मार्केटमधील कोणत्याही स्टेशनरीमध्ये विकू शकू. या व्यतिरिक्त, सरकारी किंवा खाजगी ऑफिसेस, तसेच जिथे जिथे डिस्पोजेबल बॉल पेनची आवश्यकता असते, अशा सर्व ठिकाणी ते पुरवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करता येईल.