हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय बँक आहे. SBI त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असते. ज्याचा त्यांच्या ग्राहकांना नेहमीच फायदा होत असतो. त्यांचे देखील ग्राहक त्यांच्याशी जोडून जातात. अशातच SBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणलेली आहे. ही योजना सध्या सर्वत्र लोकप्रिय होताना दिसत आहे. या योजनेअंतर्गत SBI ज्येष्ठ नागरिकांना 7.9% पर्यंत व्याज देत आहे. SBI ची (State Bank of India) ही योजना पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपेक्षा तुम्हाला जास्त व्याज देते. ही केवळ एक वर्षाची किंवा दोन वर्षाची योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत तुम्ही कमी कालावधीत चांगला परतावा मिळवू शकता.
किती मिळणार व्याजदर?
SBI च्या या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या FD वर (State Bank of India) दोन वर्षांच्या ठेवीवर 7.4% दराने व्याज मिळते. हा व्याजदर त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आकारलेला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI चा एफडीचा दोन वर्षाचा व्याजदर हा 7.90% एवढा आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेत मुदतीपूर्वी पैसे काढू शकत नाही. ही एक नॉन कॉलेबल स्कीम आहे. जर या योजनेतून तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
ज्येष्ठ नागरिकांना 15 लाख रुपये ते 2 कोटी रुपये एक वर्षाच्या ठेवीवर वार्षिक उत्पन्न 7.82% आहे. तर दोन वर्षांच्या ठेवीचे उत्पन्न हे 8.14 टक्के एवढे आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा घेऊ शकता. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI ची ही खास स्कीम खूप महत्त्वाची आहे.
SBI च्या या योजनेमध्ये तुम्ही किमान 15 लाख ते 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल. तुम्ही जर भविष्यासाठी एक मोठे आर्थिक प्लॅनिंग करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.